Now Loading

Latest Covid (कोविड)

कोरोनाने पुन्हा केंद्राची चिंता वाढवली, दिल्ली-महाराष्ट्रासह या राज्यांना पत्र लिहून चाचणी आणि लसीकरण वाढवण्यास सांगितले

आ. गिरीश महाजन यांना कोरोनाची बाधा... जळगाव ( प्रतिनिधी ) = जामनेर येथील भाजपाचे माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांना कोरोनाची बाधा झाली असून त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्यांना चाचणी करून काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत आ. गिरीश महाजन यांना कोरोनाची बाधा झाली होती. यानंतर अलीकडे त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवू लागली होती. या पार्श्‍वभूमिवर, त्यांनी चाचणी करून घेतली असता आज या चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. आ. गिरीश महाजन हे गेल्या अनेक दिवसांपासून बर्‍याच सार्वजनीक कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले होते. कालच त्यांनी भाजपच्या जिल्हा कार्यालयात बैठक घेऊन यानंतर पत्रकारांशी संवाद देखील साधला होता. या पार्श्‍वभूमिवर, आपल्या संपर्कातल्या सर्वांनी कोरोनाची चाचणी करून काळजी घ्यावी असे आवाहन आमदार गिरीश महाजन यांनी केली आहे. आज आमदार गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत जामनेर तालुक्यात विविध विकासकामांचे उदघाटन करण्यात येणार होते. हे कार्यक्रम आता रद्द करण्यात आले आहेत. तर गिरीशभाऊ हे आज सकाळपासून होम क्वॉरंटाईन झाले असल्याची माहिती मिळाली आहे