Now Loading

गुजरात: गांधीनगर महानगरपालिका निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत

गांधीनगर महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने पूर्ण बहुमताने विजय नोंदवला. नवे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखाली ही पहिलीच निवडणूक होती. गांधीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या 11 मंडळांमधील 44 जागांपैकी भाजपला 41, काँग्रेस पक्षाला 2 आणि आम आदमी पक्षाला (आप) एक जागा मिळाली आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने 17 जागा जिंकल्या होत्या, तर भाजपला 16 जागा मिळाल्या होत्या.