Now Loading

एलपीजी डोमेस्टिक सिलिंडरच्या किंमतीत 15 रुपयांनी वाढ, नवीन दर तपासा

पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि पीएनजीच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर आता एलपीजी सिलेंडरच्या किमतीही वाढल्या आहेत. पेट्रोलियम कंपन्यांनी बुधवारी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 15 रुपयांनी वाढ केली. यासह, दिल्लीमध्ये 14.2 किलो विनाअनुदानित सिलेंडरची किंमत 899.50 रुपयांवर पोहोचली आहे. यापूर्वी दिल्लीत एलपीजी सिलेंडरची किंमत 884.50 रुपये होती. तसेच 5 किलो सिलिंडरची किंमत आता 502 रुपयांवर पोहोचली आहे.
 

अधिक माहितीसाठी - NDTV