Now Loading

मानवत मधील शाळा, धार्मिक स्थळे, गर्दीची ठिकाणे, बंद राहणार, जिल्हाधिकारी यांचे आदेश

परभणी, मानवत शहर आणि परिसरातील धार्मिक स्थळे शाळा आणि गर्दीची ठिकाणे 16 ऑक्टोबरपर्यंत बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी गोयल यांनी घेतला आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्याअर्थी मागील काही दिवसात जिल्हयात मानवत शहरात मागील आठवडयात करोना बाधीत रुग्ण संख्येत वाढ होत असल्याचे निदर्शनास आले असल्याने जिल्हयात करोना संसर्ग वाढणार नाही याबाबत खबरदारी घेवून प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यामूळे सद्यस्थितीत मानवत शहरात करोना संसर्गात होणारी वाढ पाहता सामान्य नागरीकांच्या आरोग्याच्या दृष्टीने काही बाबतीत निबंध घालणे आवश्यक आहे. त्यासाठी मानवत शहरातील आठवडी बाजार, धार्मिक स्थळे, शाळा, खुल्या प्रांगणातील / लॉन वरील किंवा बंदिस्त मंगल कार्यालयातील विवाह सोहळे, खेळाची मैदाने हि गढ़ींची ठिकाणे कोरोना संसर्गाचा प्रसार होऊ नये या करीता बंद ठेवन्याचे आदेश दिले आहे.