Now Loading

ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी सावळी येथे आंदोलन

परभणी, मानवत तालुक्यातील सावळी येथे शेतकऱ्यांनी ओला दुष्काळ जाहीर करावा यासह अन्य मागण्यासाठी मुख्यमंत्र्याचा निषेध करत बुधवारी (दि.6) आंदोलन केले आहे. अतिवृष्टी आणि सततच्या होणाऱ्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. मात्र राज्य सरकार ओला दुष्काळ जाहीर करत नाही. शेतकरी अत्यंत वाईट परिस्थितीत असून सततच्या नुकसानी मुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. मात्र शासन याची गांभीर्याने दखल घेत नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी ओला दुष्काळ जाहीर करावा या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी करत मुख्यमंत्र्यांचा निषेध व्यक्त करून आंदोलन केले आहे. यावेळी मोठ्या संख्यने शेतकरी उपस्थित होते.