Now Loading

मंत्रिमंडळाने मेगा टेक्सटाईल पार्क उभारण्यासाठी 4,445 कोटी रुपयांची 'पीएम मित्र' योजना मंजूर केली

केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि अनुराग ठाकूर यांनी बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. मेगा टेक्सटाइल पार्क उभारण्यासाठी ४,४४५ कोटी रुपयांच्या पीएम मित्र योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत असेही ठरविण्यात आले आहे की, यावर्षी 11.56 लाख नॉन-गॅझेटेड रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा उत्पादकता बोनस दिला जाईल. पीयूष गोयल म्हणाले की, पीएम मित्र योजना कापड आणि वस्त्रांच्या क्षेत्रात मोठे योगदान देईल.