Now Loading

पाकिस्तानमध्ये 6.0 तीव्रतेचा भूकंप, किमान 20 ठार

शेजारील देश पाकिस्तानमध्ये गुरुवारी सकाळी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 6 असल्याचे सांगितले जात आहे. कमीतकमी 20 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि शंभरहून अधिक लोक जखमी झाले आहेत. एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या दक्षिण भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने माहिती दिली की, भूकंपाचे झटके आज पहाटे 3:30 च्या सुमारास पाकिस्तानातील हरनईच्या 14 किमी NNE वर जाणवले.