Now Loading

केशवराज बाबासाहेब महाराज मंदिर सेलू उघडण्यास परवानगी दिल्याबद्दल भाजपा अध्यात्मिक आघाडीच्या वतीने आनंदोत्सव साजरा

सेलू येथील केशवराज बाबासाहेब मंदिर परिसरात भारतीय जनता पार्टी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मंदिराचे द्वार उघडून आनंदोत्सव साजरा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशामध्ये घेतलेला मंदिरे खुल्ला करण्याचा निर्णय पेढे वाटून आनंदाने साजरा करण्यात आला. जिंतूर सेलू विधानसभेच्या आमदार मेघना बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनाच्या काळामध्ये सर्व काही चालू असताना धार्मिक मंदिर स्थळ बंद होते. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य राज्यांमध्ये धार्मिक स्थळे मंदिरे खुले करा अशी मागणी करीत असताना भक्ती संप्रदायातील वारकरी व अध्यात्म विचाराच्या लोकांना न्याय मिळाला व त्यांच्या मागणीला यश आले आहे. सेलू तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शेलु शाखेच्या वतीने वतीने केशवराज बाबासाहेब महाराज साईबाबाचे गुरु यांच्या मंदिरात जाऊन भारतीय जनता पार्टीच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. उपस्थित भाजप आध्यात्मिक आघाडी परभणी जिल्हाध्यक्ष ह. भ. प. दतराव मगर महाराज, ह. भ. प. महादेव महाराज ढवळे अध्यात्म आघाडी सेलु, जिल्हा कोषाध्यक्ष माहादेव गायके, जीवन ढवळे जिल्हा चिटणीस युवा मोर्चा, तालुकाध्यक्ष बाळासाहेब जोगदंड, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शिवहारी शेवाळे, किसाण मोर्चा तालुकाध्यक्ष दगडोबा जोगदंड पाटील, शहराध्यक्ष कपिल फुलारी, गजू नांद्रेकर सोशल मीडिया संयोजक, गोविंद मगर चिटणीस किसान मोर्चा, नितीन चव्हाण किसान मोर्चा उपाध्‍यक्ष, अमोल भोसले युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष, गोविंद शर्मा शहरध्यक्ष, आ. रामप्रसाद बोर्डीकर मित्र मंडळ सेलू, सचिन धापसे बोर्डीकर मित्र मंडळ सदस्य सेलू, रमेशराव तारडे आदीसह कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.