Now Loading

पंतप्रधान मोदींनी जपानचे नवे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्याशी काल दूरध्वनीवर संवाद साधला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी जपानचे नवे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्याशी दूरध्वनीवर संवाद साधला. किशिदा यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच दोन्ही नेते बोलले. जपानच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी त्यांचे अभिनंदन केले आणि जागतिक भागीदारी वाढवण्याविषयी बोलले. भारत आणि जपानमधील विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी आणि इंडो-पॅसिफिक क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी आपण त्यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.
 

अधिक माहितीसाठी: The Times of India | Hindustan Times