Now Loading

मुंबई: 6 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली डिलिव्हरी बॉयला अटक

देशातील अनेक राज्यांतून बलात्काराची प्रकरणे बाहेर येत आहेत. त्याचबरोबर आर्थिक राजधानी मुंबईत 6 वर्षांच्या मुलीवर कथित बलात्कार झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. चारकोप पोलीस स्टेशन परिसरात 6 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी एका डिलीव्हरी बॉयला अटक केली आहे. चारकोप पोलिसांनी IPC कलम 376 आणि POCSO कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने आरोपीला 9 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याचबरोबर पोलिस आरोपींकडून घटनेशी संबंधित माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.