Now Loading

Cruise Drugs Case: कोर्टाने आर्यन खानची जामीन याचिका फेटाळली

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला क्रूज ड्रग्स प्रकरणात जामीन मिळालेला नाही. अन्य दोन आरोपी अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांचा जामीन अर्जही न्यायालयाने फेटाळला आहे. आर्यनच्या वकिलाला आता जामिनासाठी सत्र न्यायालयात जावे लागेल. आज या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान आर्यनचे वकील सतीश मानशिंदे यांनी न्यायालयाला सांगितले की, कथित गुन्ह्याची शिक्षा मृत्यू किंवा जन्मठेपेची शिक्षा नसल्यास दंडाधिकारी न्यायालयाला आरोपीला जामीन देण्याचा अधिकार आहे.