Now Loading

सुरनकोट एन्काऊंटर: जेसीओसह 5 जवान शहीद, चकमकीत एक दहशतवादी ठार

जम्मू -काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यातील सुरनकोटमध्ये सुरू असलेल्या चकमकीत लष्कराचे मोठे नुकसान झाले आहे. चकमकीदरम्यान लष्कराच्या कनिष्ठ कमिशन्ड ऑफिसरसह (जेसीओ) पाच जवान शहीद झाले. नियंत्रण रेषेला लागून असलेल्या सुरानकोट परिसरातील जंगलात सुरू असलेल्या चकमकीत एक दहशतवादीही ठार झाला आहे. तीन ते चार दहशतवाद्यांना वेढा घातल्याची माहिती आहे. जवानांच्या हौतात्म्यानंतर लष्कराने आपले ऑपरेशन अधिक तीव्र केले आहे.
 

अधिक माहितीसाठी: India TV | DNA