Now Loading

'महाराष्ट्र बंद'ला परभणीत संमिश्र प्रतिसाद,

परभणी, उत्तर प्रदेशातील लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेत आज सोमवारी (दि.11) महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व सत्तारुढ आघाडीतील अन्य घटकपक्षांनी पुकारलेल्या 'महाराष्ट्र बंद' आंदोलनास सोमवारी (दि.11) शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. दरम्यान, शिवाजी चौक, वसमत रोड, जिंतूर रोड आदी भागात काही काळ बाजारपेठा बंद होत्या. शाळा, महाविद्यालये नेहमीप्रमाणे सुरु होती. लखीमपुर शेतकरी हत्याकांड निषेधार्थ आणि त्यातील आरोपींना कडक शिक्षा देण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने परभणी शहरातील श्री शिवाजी चौक येथून सोमवारी (दि.11) रॅली काढण्यात आली. या वेळी जोरदार घोषणाबाजी करत केंद्र सरकारचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला. या पुकारलेल्या बंदला नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. यावेळी खा. संजय जाधव, खा. फौजीया खान, आ. सुरेश वरपुडकर, आ. राहुल पाटील, मा. आ. तुकाराम रेंगे पाटील, प्रा. किरण सोनटक्के, विशाल कदम, नदीम इनामदार आदींची उपस्थिती होती. या बंदला जिल्हा भरातून संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. या प्रसंगी उत्तर प्रदेशातील लखीमपुर येथे लोकशाही मार्गाने शांततेत आदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर भाजपच्या केंद्रीय मंत्र्याच्या मुलासह इतर भाजपाच्या कार्यकत्यांनी भरधाव वेगान गाड्या चालवून अनेक शेतकरी आंदोलकांना चिरडले. या घटनेत शेतकऱ्यांचा मृत्यु झाला आहे. ही घटना दुर्दैवी आहे. या घटनेने जनरल डायर ने केलेल्या जालीयनवाला बाग हत्याकांडाची आठवण करून दिली. या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि आरोपींना कठोरात कठोर शासन करून पिडीत शेतकरी कुटुंबांना न्याय देण्यात यावा, अशी मागणी महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. सोमवारी सकाळपासून नेहमीप्रमाणे बाजारपेठा उघडल्या. या दरम्यान लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परभणी शहरातून काही भागात फिरून बंदचे आवाहन केल्यावर बाजारपेठांतील व्यवहार पूर्णतः ठप्प झाले होते. खासदार संजय जाधव, खासदार श्रीमती फौजिया खान, आ. सुरेश वरपुडकर, आ.डॉ. राहुल पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम, माजी खा. अ‍ॅड. तुकाराम रेंगे पाटील, उपहापौर भगवान वाघमारे, स्थायी समिती सभापती गुलमीर खान, रविंद्र सोनकांबळे, प्रा. रामभाऊ घाडगे, काँग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार, प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिवलिंग बोधणे, बाळासाहेब देशमुख, श्रीधर देशमुख, विनोद कदम, नागसेन भेरजे, रोडगे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष देशमुख, महानगराध्यक्ष प्रा. किरण सोनटक्के, शेख शब्बीर, नंदा राठोड, रोडगे, महापौर सौ. अनिता सोनकांबळे, जानू बी आदींनी गांधी पार्क, गुजरी बाजार, कच्छी बाजार या मुख्य बाजारपेठेतून सकाळी 11 च्या सुमारास फेरफटका मारला आणि व्यापार्‍यांना बंदचे आवाहन केले. या मंडळींच्या आवाहनाला प्रतिसाद देत व्यापार्‍यांनी आपआपली प्रतिष्ठाने बंद केली. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलनकर्त्यांनी ठाण मांडून बंद यशस्वी करण्याचा प्रयत्न केला. दुपारी एक नंतर सर्व व्यवहार सुरळीतपणे झाले.