Now Loading

शोपियान फेरीपोरा चकमकीत सुरक्षा दलांनी 2 दहशतवाद्यांचा खात्मा केला

शोपियानमधील तुलरानमध्ये द रेझिस्टन्स फ्रंट (TRF) च्या तीन दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर आता सुरक्षा दलाने शोपियानच्या फेरीपोरा भागात दोन दहशतवाद्यांना ठार केले आहे. जम्मू -काश्मीरमध्ये गेल्या 34 तासांत ही पाचवी चकमक आहे, ज्यात आतापर्यंत सात दहशतवादी मारले गेले आहेत. गेल्या आठवड्यात पुंछ जिल्ह्यातील सुरणकोटच्या जंगलात दहशतवाद्यांनी लष्करावर केलेल्या हल्ल्यात जेसीओसह पाच सैनिक शहीद झाले. मंगळवारी एसओजी, लष्कराच्या 34 आरआर आणि सीआरपीएफच्या 14 बटालियनच्या संयुक्त पथकाने सुमारे तीन ते चार तास चाललेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला.