Now Loading

ऑक्टोबरमध्ये सीएनजी आणि पीएनजीचे दर दुसऱ्यांदा वाढले

इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड (IGL) ने पुन्हा एकदा दिल्ली, नोएडा, ग्रेटर नोएडा, गाझियाबाद आणि गुरुग्राम येथे कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) आणि पाईप केलेल्या नैसर्गिक वायू (PNG) च्या दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. नवीन किमती आज सकाळी 6 पासून लागू झाल्या आहेत. आयजीएलने दुसऱ्यांदा या महिन्यात दरात वाढ केली आहे. गॅस वितरण कंपनीने म्हटले आहे की, या दरवाढीनंतर दिल्लीमध्ये सीएनजीचा नवा दर 49.76 रुपये प्रति किलोपर्यंत वाढला आहे, तर पीएनजीच्या किंमती 35.11 रुपये प्रति स्टँडर्ड क्यूबिक मीटर वर गेल्या आहेत.