Now Loading

IPL 2021 क्वालिफायर 2: KKR ने DC ला 3 गडी राखून पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला

गोलंदाज आणि अव्वल फळीतील फलंदाजांच्या शानदार कामगिरीनंतर कोलकाता नाईट रायडर्सने शारजाह येथे बुधवारी आयपीएल 2021 च्या दुसऱ्या पात्रता सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा तीन गडी राखून पराभव केला. या सामन्यात कोलकाताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी केली आणि दिल्लीला पाच गडी बाद केवळ 135 धावांवर रोखले. दुसऱ्या डावात केकेआरचे व्यंकटेश अय्यर (55) आणि शुभमन गिल (46) यांनी पहिल्या विकेटसाठी 74 चेंडूत 96 धावांची भागीदारी करून संघाला विजयाच्या जवळ नेले.