Now Loading

बेलाटी परिसरात विहीर तरंगताना आढळला महिलेचा मृतदेह

शेतातील विहिरीत तरंगताना एका महिलेचा मृतदेह आढळुन आला, ही घटना उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटी गावच्या शिवारात घडली. सारिका यशवंत वाबरे वय 28 वर्ष राहणार बेलाटी गाव असे मृत महिलेचे नाव आहे.ही महिला गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास संदीप नारायण पेटकर यांच्या गट क्रमांक 160 या शेत जमिनीतील विहिरीमध्ये मृतावस्थेत तरंगताना आढळून आली, ही माहिती मिळताच सलगर वस्ती पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक घाटे हे घटनास्थळी दाखल झाले.  त्यांनी सिव्हिल हॉस्पिटल मधील लादेन यांची ऍम्ब्युलन्स बोलावून घेऊन त्या विहीरीतून महिलेचा मृतदेह बाहेर काढून पुढील कारवाईसाठी सिव्हिल हॉस्पिटलला पाठवण्यात आले. विहिरीत महिला मेल्याची माहिती मिळाल्याने गावातील ग्रामस्थांची बघायला एकच गर्दी झाली होती.