Now Loading

शिवसेना नेते मंत्री गुलाबराव पाटील सोलापूरात दाखल ; सोलापूरकरांना केले हे आवाहन

राज्याचे पाणी व स्वच्छता मंत्री व शिवसेना नेते गुलाबराव पाटील हे गुरुवारी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत, त्यांचे सकाळी साडे नऊ वाजता विमानतळावर आगमन झाले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, ग्रामीण पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता कोळी, शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, जिल्हाप्रमुख गणेश वानकर, शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगावकर यांनी स्वागत केले यावेळी खाजगी सचिव अशोक पाटील, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, मंडल अधिकारी हेडगिरे यांची उपस्थिती होती. यावेळी जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने स्वच्छ सर्व्हेक्षण ग्रामीण 2021 मोबाईल ऍपच्या लोगोचे अनावरण नामदार गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. नामदार पाटील म्हणाले, 15 ऑक्टोबर हा जागतिक हात धुवा दिन म्हणून पाळला जातो, कोरोनाने दाखवून दिलंय स्वच्छतेला किती महत्व आहे हे. मंत्रालयपासून ते सीईओ कार्यालयापर्यंत वडीलधाऱ्यांपासून ते लहान बालकांपर्यंत हात स्वच्छ धुण्याचे आवाहन करण्यात आलं आहे, मेडिकल सांगण्यानुसार 25 टक्के आजार हे हात धुतल्यावर कमी होतात, त्यामुळे सर्वाना आवाहन आहे की, कोरोना कमी झाला असला तरी लहान मुलांचे हात स्वच्छ धुवून आजारापासून दूर रहा, आपला देश, आपले राज्य, आपला जिल्हा व गाव स्वच्छ राहण्यासाठी या मोहिमेत हिरीरीने सहभाग नोंदवा असे आवाहन केले. प्रारंभी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी प्रास्ताविक करत हात धुवा दिनाचे महत्व सांगत स्वच्छ सर्व्हेक्षण ग्रामीण 2018 मध्ये सोलापूर जिल्हा राज्यात दुसरा आला होता, यंदा ही आम्ही चांगली तयारी केल्याचे सांगितले व  स्वच्छ सर्व्हेक्षण ग्रामीण 2021 मोबाईल ऍपच्या लोगोचे अनावरण करण्याची विनंती केली.