Now Loading

सोन्याच्या दागिन्यासह अल्पवयीन मुलगी गायब

सैफुल परिसरात एक अल्पवयीन मुलगी तिच्या घरातून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम घेवून घरातून निघून गेली. अशी फिर्याद तिच्या वडिलांनी विजापूर नाका पोलिसांकडे दिली. १२ वर्षांची तरूणी ही तिच्या घरात असताना ऑनलाईन अभ्यास करते, असे सांगून बीटीएस अॅप्लीकेशनवर साऊथ कोरिया येथील लोकांशी ऑनलाईन मिटिंग, चॅटींग करून तिने घरातून ४ तोळे सोन्याचे दागिने आणि १६ हजार रूपये रोख असा ऐवज घेवून ती घरातून निघून गेली. तिला कोणीतरी आमिष दाखवून घेवून गेल्याची फिर्याद तिच्या वडिलांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात दिली आहे.