Now Loading

सिव्हिलचे अधिष्ठाता डॉ संजीव ठाकूर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा

सोलापूर शासकीय रुग्णालय सिविल हॉस्पिटल मधील वर्ग चार मधील सफाईगार लॅबटेक्नीशियन इत्यादी विभागामध्ये काम करणारे कामगारांचा आरोग्य सेवकांचा जवळजवळ तीन ते चार महिन्यांचा पगार  मिळालेला नसून याबाबतीत अधिष्ठाता संजीव ठाकूर व  डॉ. अग्रजा चिटणीस  (कोव्हिड 19 नोडल ऑफीसर) हे जबाबदार आहेत. गेल्या अनेक दिवसापासून काम करणारे सेवक पगार संदर्भात जेव्हा अधिष्ठाता व डॉ. चिटणीस यांच्याकडे जातात त्यांना गेल्या अडीच ते तीन महिन्यापासून उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत.  त्यावरून असे स्पष्ट होते की शंभर ते दीडशे आरोग्य सेवकांचे पगार थकीत असल्याने त्याठिकाणी मोठा भ्रष्टाचार होताना दिसून येत आहे. त्यामुळे ज्या कामगारांनी आरोग्य सेवकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णसेवा केलेली आहे. अशा आरोग्य सेवकांची फसवणूक झाल्याचे निदर्शनास येत आहे म्हणून तात्काळ योग्य ती कारवाई करण्यात यावी अन्यथा पुढील काळात उग्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे महाराष्ट्र उपाध्यक्ष सुहास कदम यांनी दिला असून अधिष्ठाता ठाकूर व डॉ चिटणीस यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सदर बझार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकर पाटील यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.