Now Loading

आम्रवन महाविहारात धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा

सेलू तालुक्यातील देवगाव फाटा येथील आम्रवन महाविहार येथे आज 65 वा धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा करण्यात आला. रोहिदास जावळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर तथागत भगवान बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे संयोजक, आम्रवन महाविहाराचे प्रमुख अशोक अंभोरे हे होते. यावेळी पोलिस पाटील भारत ढाले, पत्रकार कैलास ढाले, साहेबराव खंदारे, सुभाष वाघ, दुर्गादास ढाले, विश्वजीत ढाले, सुंदर शेजुळ, शिवाजी शेजूळ, सुधाकर आवचार, प्रकाश लोखंडे, भास्कर ढाले, सूरज ढाले, सोपान शेजुळ, उमेश डोके, अर्जुन शेजूळ आदींची उपस्थिती होती.