Now Loading

महिलांवर अन्याय करणाऱ्यांची गय केली जाणार नाही : राष्ट्रवादी काँग्रेसने केले नव्या पोलीस आयुक्तांचे स्वागत

सोलापूर शहराचे नवे पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी नुकताच पदभार घेतला. त्यांचे शहरातील विविध पक्ष, सामाजिक संघटना, संस्थांच्या प्रतिनिधींकडून त्यांचे स्वागत होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दलाच्या वतीने शहर अध्यक्ष चंद्रकांत पवार आणि प्रदेश उपाध्यक्ष विद्या लोलगे यांच्या नेतृत्वाखाली आयुक्त बैजल यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय खेळाडू शुभम अवस्थी, राम साठे, आनंद मुस्तारे, वसीम शेख, मनीषा नलावडे, सुनंदा साळुंखे उपस्थित होते. आयुक्त बैजल यांनी सर्व पदाधिकाऱ्यांची ओळख करून घेतली. यावेळी सोलापूर शहरात विशेषतः महिलांवर होणारे अन्याय -अत्याचार कमी करण्यासाठी पोलीस प्रशासनाने प्रयत्न करण्याची अपेक्षा महिलांनी व्यक्त केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत हरीश बैजल यांनी महिलांवर कुठे अन्याय झाल्यास थेट पोलिसांना संपर्क करावा, कुणाची ही गय केली जाणार नाही असे आश्वासन दिले.