Now Loading

लग्नात मानपान, हुंडा नाही दिल्यामुळे विवाहितेचा छळ

तुझ्या माहेर कडील लोकांनी लग्नात आमचा मानपान केला नाही. हुंडा दिला नाही, तु आम्हाला पसंत नसताना सून म्हणून घरी आणल्याच्या कारणांवरून शारिरीक मानसिक छळ केल्याची फिर्याद अमृता गिरीषकुमार तोलानी (वय ३४, रा. सिंधु नगर, ) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली आहे. गिरीष तोलानी, मनोहरलाल नवलमल तोलानी, रानी उर्फनिमी मनोहरलाल तोलानी, कन्हैय्या मनोहरलाल तोलानी, प्रिती कन्हैय्या तोलानी, ज्योती गोपाळ सेवानी असे आरोपींचे नावे आहेत. याबाबत अधिक हकीकत अशी की, ९ डिसेंबर २००५ पासून ते २४ जुलै २०२१ रोजीपर्यंत मार्कडेय नगर, कुमठा नाका याठिकाणी सर्व आरोपीतांनी तुझ्या माहेर कडील लग्नात मानपान केला नाही, हुंडा दिला नाही, तुला स्वयंपाक करता येत नाही, तु आम्हाला पसंत नसताना तुला सुन म्हणून घरी आणली आहे. तसेच फिर्यादीस एका खोलीमध्ये कोंडून उपाशी ठेवून शारिरीक व मानसिक छळ केला आहे. २४ जुलै २०२१ रोजी मनोहरलाल तोलानी, निमी तोलानी यांचे ऐकुन गिरीष तोलानी याने फिर्यादीच्या चारित्र्यावर संशय घेवून मुलाबाळांसह राहत्या घरातून हाकलून दिले असल्याची तक्रार दिली आहे. पुढील तपास पोना गायकवाड करीत आहेत.