Now Loading

गाडीचे हप्ते भरतो म्हणून गाडी वापरली मात्र गाडी विकून केली फसवणूक

गाडीचा फायनान्सचा हप्ता भरतो असे सांगून दोन वर्ष गाडी वापरली हप्ता न भरता गाडीची परस्पर विल्हेवाट लावून फसवणूक केल्याची फिर्याद फारूख जिलानी शेख (वय ४६ वर्षे, रा. मु.पो. कारंबा, ता. उत्तर सोलापूर) यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात दिली आहे. ही घटना १५ डिसेंबर २०१९ रोजीपासून आजतगायत पर्यतची आहे. याबाबत अधिक हकीकत अशी की, बंडू माने रा. शेट वस्ती जवळ, अमराई, दमाणी नगर यांने आयशर कंपनीचा सहा टायर गाडी क्रं. एम.एच. १२ एफ झेड ३१८२ किंमत लाख रु ही आरोपीताने वापरून गाडीचा फायनान्स चा हप्ता असे सांगून, दोन वर्ष गाडी वापरून, फायनान्स कंपनीचे पूर्ण हप्ते न भरता, गाडी फिर्यादीस न देता, विश्वासघात करून ही गाडी कोठेतरी विल्हेवाट लावली आहे. पुढील तपास पोहेकॉ थोरात करीत आहे.