Now Loading

छत्तीसगडच्या रायपूर रेल्वे स्थानकावर झाला मोठा स्फोट, 4 सीआरपीएफ जवान झाले जखमी

दि.१६ अक्टोबर रोजी, छत्तीसगडच्या रायपूर रेल्वे स्टेशनमध्ये सकाळी स्फोट झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा स्फोट CRPF च्या विशेष ट्रेनमध्ये सकाळी 6:30 वाजता झाला. जेव्हा इग्निटरने भरलेला बॉक्स एका बॉक्सच्या मजल्यावर पडला. रायपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, CRPF च्या 211 बटालियनचे जवान जम्मूहून विशेष ट्रेनमध्ये जात होते. ग्रेनेडने भरलेले बॉक्सही त्यांच्यासोबत ठेवण्यात आले होते. बॉक्स एका बोगीच्या मजल्यावर पडला आणि ग्रेनेडचा स्फोट झाला. ज्यात 4 जवान जखमी झाले आहेत. रायपूरचे एसपी प्रशांत अग्रवाल यांनी सांगितले की, ही ट्रेन ओडिशावरून जम्मूला जात होती.