Now Loading

सुरतमधील पाच मजली इमारतीत लागली भीषण आग, २ जणांचा झाला मृत्यू

सोमवारी,  सुरतमध्ये पाच मजली इमारतीत पॅकेजिंग युनिटला लागलेल्या भीषण आगीत दोन कामगारांचा मृत्यू झाला. कडोदरा औद्योगिक क्षेत्रात असलेल्या या पॅकेजिंग युनिटमधून 125 लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. कडोदरा पोलीस निरीक्षक हेमंत पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे 4.30 च्या सुमारास विवा पॅकेजिंग कंपनीला आग लागली. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आग लागली आणि ती वेगाने इतर मजल्यांमध्ये पसरली.

अधिक माहितीसाठी - Times Now News | India TV | NDTV