Now Loading

मतदार जागृतीसाठी 16 नोव्हेंबरला विशेष ग्रामसभेचे नियोजन -मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

पुणे - भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केला असून ग्रामीण भागात मतदार जागृतीसाठी 16 नोव्हेंबरला विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याच्या सूचना ग्रामविकास विभागामार्फत देण्यात येतील, असे प्रतिपादन प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले.