Now Loading

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीची बारामतीत आढावा बैठक संपन्न

बारामती :आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तसेच भव्य पक्ष प्रवेशाच्या निमित्ताने वंचित बहुजन आघाडीची नुकतीच आढावा बैठक पार पडली. पुणे जिल्हा महासचिव मंगलदास निकाळजे,जिल्हाउपाध्यक्ष ऑड. वैभव काळे,शहराध्यक्ष अक्षय शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहरात ही बैठक संपन्न झाली. सदर बैठकीत आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बाबत आढावा घेण्यात आला. तसेच वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पक्षाचे जिल्हाध्यक्ष विनोद भालेराव यांच्या उपस्थितीत 24 ऑक्टोबर रोजी बारामतीत होणाऱ्या कार्यक्रमात भव्य पक्ष प्रवेशाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शहराध्यक्ष अक्षय शेलार यांनी दिली.