Now Loading

कचरा डेपोचे होणार उद्यान

तुळजापूर रोडवरील महापालिकेचा कचराडेपो आता कायमस्वरुपी हटविला जाणार आहे. त्याठिकाणचा जुना कचरा बायोमायनिंग करून नष्ट केला जाणार आहे. त्यासाठी ३२ कोटी रुपयांची गरज असून तसा कृती आराखडा तयार करून महापालिकेने शासनाकडे निधी मागितला आहे. जुन्या कचऱ्यापासून माती, खत तयार करून तो त्याठिकाणी होणाऱ्या बगिचा तथा उद्यानासाठी वापरला जाणार आहे.