Now Loading

गोवा बनावटीची दारू सोलापुरात जप्त;26 लाखांचा मद्यसाठा हस्तगत

ल राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे.या कारवाईमध्ये एक आयशर टेम्पों, स्वीप्ट कारसह १९० बॉक्स गोवा बनावटीचा अवैधनमद्यसाठा असा एकूण 26 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क,महाराष्ट्र राज्य आयुक्त कांतीलाल उमाप,पुणे विभागाचे विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे, सोलापूरचे अधीक्षक नितीन धार्मिक व उपअधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क ब विभागचे निरीक्षक अंकुश आवताडे, व निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक सोलापूरचे निरीक्षक सुदर्शन संकपाळ, दुय्यम निरीक्षक श्री.सुनिल पाटील, झगडे,सहाय्यक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर व जवान आण्णा कर्चे, प्रकाश सावंत,चेतन व्हनगुंटी, नंदकुमार वेळापुरे, किशोर लुंगसे, विकास वडमिले व विजय शेळके यांच्या पथकाने 18 ऑक्टोबर रोजी रात्री ७.०० ते ०९:३० चे सुमारास शेटफळ ते कुर्डवाडी रस्त्यावर, शेटफळ चौकालगत हॉटेल शिवप्रसाद धाब्यासमोर यशस्वी कारवाई केली आहे. यामध्ये चार संशयीत आरोपीना अटक करण्यात आली आहे. विलास मोराळे,कृष्णा मुजमुले,गणेश जाधव मिलिंद मगरे यांना अटक करून त्यांचे ताब्यातील एक स्वीप्ट कार,आयशर टेम्पों असे दोन वाहने व गोवा बनावटीचे विविध बँडचे एकुण १९० बॉक्स जप्त करण्यात आले आहे.संशयीत आरोपी विरूद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कायद्याअंतर्गत गुन्ह्याची नोंद केला असुन पुढील तपास निरीक्षक सुदर्शन संकपाळ हे करीत आहेत.