Now Loading

तरुणांना रोजगार देणार एमआयएम शहर अध्यक्ष फारूक शाब्दी यांचे आश्वासन

पैगंबर जयंती किंवा ईद ए मिलाद  एम ग्रुपच्या वतीने मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आली.मजरेवाडी रोड येथील आनंद नगर येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यातआला होता.यावेळी एमआयएम शहर अध्यक्ष फारूक शाब्दी यांनी येऊन दरुद शरीफचे पठण केले.फारूक शाब्दी यांनी तरुणांना बेरोजगारी पासून मुक्त करू असे आश्वासन दिले. गेल्या अकरा वर्षांपासून आनंद नगर येथील तरुण कार्यकर्ते सद्दाम इनामदार,जाविद मुल्ला,इसाम शेख,जहिर सत्तार शेख यांनी पुढाकार घेत गोरगरीब नागरिकांना जेवणाची व्यवस्था केली होती.फारूक शाब्दी यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांत वेगळा आनंद व उत्साह दिसून आला.स्थानिक नगरसेवक अजहर हुंडेकरी यांनी देखील हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोठी मदत केली.