Now Loading

अपघातग्रस्त मोटरसायकलस्वाराचा मृत्यू

भारती विद्यापीठासमोर भरधाव वेगात मोटरसायकल चालवून अपघात होवून मोटरसायकलस्वार तरूण गंभीर जखमी होवून मरण पावला. ओमकार धनाजी वाघमारे (जुनी मिल चाळ) असे त्या म मोटरसायकलस्वाराचे नाव आहे. मयत मोटरसायकलस्वार हा रेहान मुन्ना खान (वय २३, उत्तर प्रदेश) याला डबल सीट घेवून भरधाव वेगाने विजापूर रोडवरील भारती विद्यापीठ समोरून जात होता. त्यादरम्यान, स्वाद हॉटेलसमोर आला असताना पडला त्यात दोघेजण गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान ओमकार वाघमारे हा मृत झाला. याबाबत सहाय्यक फौजदार गोपी मोहन वाल्मिकी यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तपास पोलीस नाईक सोनार करीत आहेत.