Now Loading

प्रत्येक धर्मगुरूंनी मानवतेचा संदेश दिला:भारत जाधव

ईद ए मिलाद म्हणजेच पैगंबर जयंती निमित्त सोलापुरात विविध ठिकाणी अन्नदान,सरबत वाटप करून सण साजरा केला.अमन चौक ते मजरेवाडी रोड या दरम्यान असलेल्या आनंद येथील तरुणांनी पैगंबर जयंती मोठया उत्साहाने साजरा करण्यात आली.मंगळवारी सायंकाळी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत गोरगरीब नागरिकांना अन्नदान करण्यात आले.राष्ट्रवादी काँग्रेसचे भारत जाधव,संतोष पवार,अमीर शेख,जुबेर बागवान यांनी यावेळी जनता गॅरेज व एम ग्रूपच्या तरुणांना ईदच्या शुभेच्छा देत अन्नदान वाटप केले. भारतात अनेक धर्म आहेत त्यामधील शीख,ख्रिचन,इस्लाम,बौद्ध ,हिंदू आदी धर्मातील प्रत्येक धर्मगुरूनी मानवतेचा संदेश दिला आहे.गरीब व भूकेल्याना पोटभर जेवण देणे हीच मानवता आहे.आणि प्रत्येक धर्मगुरूनी मानवतेचा संदेश दिला आहे.असे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष भारत जाधव यांनी आपल्या मनोगतातुन सांगितले.प्रत्येक व्यक्तीने एकदुसऱ्याची मदत करावी असेही आवाहन यावेळी केले.हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सद्दाम इनामदार,जहीर शेख,जविद मुल्ला,आका शेख,आदींनी परिश्रम घेतले.