Now Loading

लुटमार करणाऱ्या चोरट्यांच्या मनाठा पोलिसांनी आवळल्या मुसक्या

नागपूर- तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर बरडशेवाळा येथील सरपंच ज्ञानेश्वर मस्के यांच्या शेतातील आखाड्याजवळ बायपासवर अर्धवट अवस्थेत असलेल्या कामाच्या ठिकाणी वाहनांचा वेग कमी करावा लागत असल्याचा फायदा घेत दडून बसलेल्या अज्ञात चोरट्यांनी ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजताच्या दरम्यान अशोक महादू खोकले लिमटोक ता. कळमनुरी याची दुचाकी अडवून मारहाण करून मोबाईल व नगदी रुपये हिसकावूनघेतले. आखाडा असल्याने झालेल्या आराडाओरडेने सरपंच ज्ञानेश्वर मस्के, रामेश्वर आनंदराव मस्के तिथे गेले असता, चोरट्यांची संख्या जास्त असल्याने या तिघांनाही मारहाण केली. आवाजाने झालेल्या गर्दीमुळे अंधाराचा फायदा घेत चोरटे पसार झाले. या घटनेची माहिती पोलिस पाटील यांनी मनाठा पोलिस दिल्याने त्यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली घटनेचा तपास पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी स्वतःकडे घेत तपासाची चक्रे गतीने फिरवत जवळच असलेल्या शिवगंगा पेट्रोल पंपावरील सि.सी.टि.व्ही फुटेज ठाण्यालातपासणी केली असता चोरट्यांनी पेट्रोल भरले असल्याचे दिसून आले. या फुटेजचा धागा पकडून आठ तासात मुख्य आरोपी किरण दत्ता भोसले वय (१८) यास त्याच्या राहत्या गावातून निवघा बाजर येथून ताब्यात घेतले चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात मनाठा पोलिसांना यश आले त्याच्याकडून चोरीचे साहित्य हस्तगत करून पोलिस पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.,