Now Loading

जम्मू-काश्मीर: सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु, 2 दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यातील द्रागड भागात भारतीय सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. या चकमकीत सुरक्षा दलाने काही तासांमध्ये दोन दहशतवाद्यांना ठार केले आहे. दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर सुरक्षा दलांनी शोध मोहीम राबवली आणि इतर कोणत्याही दहशतवाद्याची खातरजमा झाली नाही, तेव्हा सुरक्षा दलाने शोधमोहीम थांबवली आणि दोन्ही दहशतवाद्यांचे मृतदेह आणि चकमकीच्या ठिकाणाहून जप्त केलेली शस्त्रे घेऊन तेथून परतले. काश्मीरचे आयजीपी विजय कुमार म्हणाले की, मारलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटली आहे.