Now Loading

संभाजी ब्रिगेड सोलापूर च्या वतीने नम्र निवेदन

संभाजी ब्रिगेड सोलापूर च्या वतीने नम्र निवेदन सादर करण्यात येते की एसटी  महामंडळाच्या  कर्मचाऱ्यांचे वेतन वेळच्या वेळी मिळत नसल्यामुळे कुटुंबाच्या प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी हे कर्मचारी कर्ज घेतात आणि नंतर हतबल कर्मचारी आत्महत्येचे पाऊल उचलतात.एसटी महामंडळातील कमी पगार आणि अनियमित वेतनामुळे जीवन संपवत असल्यामुळे  महाराष्ट्र शासनाने तात्काळ एसटी महामंडळास पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा तसेच एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर करण्यात यावे अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने सोलापूर अगर प्रमुख यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे कोरोनामुळे  मागील दीड वर्षांपासून एसटी महामंडळाला कोट्यवधी रुपयांचा तोटा झालेला आहे. त्यामुळे एसटी महामंडळाचे आर्थिक बजेट पूर्णपणे काेलमडले असून एसटी कर्मचाऱ्यांचे  काही महिन्याचे वेतन रखडले आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर एसटी कार्यशाळेतील कर्मचाऱ्याने आर्थिक चणचणीला कंटाळून राहत्या घरी आत्महत्या केली होती एसटी महामंडळातील कमी पगार आणि अनियमित वेतनामुळे जीवन संपवत असल्याचं चित्र आहे  आतापर्यंत तब्बल २७ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे. पहिली आत्महत्या ७ मार्च  २०२० रोजी झाली होती त्यानंतर हे आत्महत्यांचे सत्र असेच सुरू असून महामंडाळाकडून कोणतीही ठोस पावले उचलली जात नाहीत. जेव्हा कर्मचाऱ्यांची आत्महत्याचे प्रमाण वाढते तेव्हा शासनाला महामंडळा ला जाग येऊन कुठेतरी थोडेफार निधीची घोषणा करून तात्पुरत्या स्वरूपात मलमपट्टी केली जाते गिड्डे आणि गवळी यांच्या आत्महत्येनंतर कर्मचाऱ्यांकडून महाविकास आघाडी सरकार विरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तरी माननीय महोदयांनी तात्काळ एसटी महामंडळाच्या पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा जेणेकरून एसटी महामंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होईल मागणी करण्यात आलेली आहे यावेळी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष श्याम कदम संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले कार्यअध्यक्ष अरविंद शेळके शहर उपाध्यक्ष सिताराम बाबर पिंटू घंटे प्रसिद्धीप्रमुख शाहरुख पटेल सुलेमान पिरजादे प्राजक्ता बागल संपर्कप्रमुख दत्ता जाधव मुस्ताक शेख आदित्य गायकवाड उपस्थित होते.