Now Loading

तिसरी पुणे ग्रामीण पेंचाक सीलाट चॅम्पियनशीप स्पर्धा 2020-21 संपन्न

पुणे जिल्ह्यातील बारामती येथील सूर्यनगरी या ठिकाणी हायटेक टेक्स्टाईल पार्क बारामतीच्या अध्यक्षा सौ सुनेत्रा वहिनी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ऑल पुणे ग्रामीण पेंचाक सीलाट असोशियशन यांच्या वतीने जिल्हास्तरीय कराटे स्पर्धा संपन्न झाली ही स्पर्धा रेग्यु, तुंगल, फाईट, व गंडा अश्या चार इव्हेंट मध्ये पार पडली. या जिल्हास्तरीय स्पर्धेत एकूण पाच जिल्ह्यातील 80 खेळाडूंनी सहभाग नोंदवला. त्यात प्रथम पारितोषिक बारामती तालुक्याने मिळवून द्वितीय व तृतीय क्रमांक दौंड आणि इंदापूर या तालुक्यांनी मिळवला. या स्पर्धेचे उदघाटन समारंभा वेळी काटेवाडी गावचे सुपुत्र (IPS) श्री अल्ताप शेख,काटेवाडीचे उपसरपंच श्री समीर मुलांनी,राजाभाऊ झारगड व ऑल पुणे ग्रामीण पेंचाक सीलाट चे साहेबराव ओहोळ,भोसले सर,गवळी सर,सरोदे सर,अक्षय थोरात,अजित मलगुंडे इत्यादी उपस्थित होते.