Now Loading

बँक खातेदाराच्या वारसाला विमा संरक्षणाची दोन लाख रुपयांची रक्कम वितरित;बँक ऑफ इंडिया होटगी रोड शाखेचे मानले आभार

बँक ऑफ इंडिया होटगी रोड शाखेत इराण्णा माशाळे यांचे बँकेत खाते होते.बँकेच्या अधिकाऱ्यांनी खातेदार इरण्णा मशाळे यांना पंतप्रधान जीवन ज्योती योजने अंतर्गत विमा सुरक्षा कवच दिले होते.ऑगस्ट 2021 मध्ये इरण्णा मशाळे यांचे आकस्मित निधन झाले. त्यांच्या वारसदारांना सदर योजनेचे विमा संरक्षण रकम बँक ऑफ इंडियाची इन्शुरन्स कंपनी स्टार युनियन दाई-ची या कंपनीच्या वतीने इन्शुरन्स रकम २ लाख मंजूर करण्यात आली. त्याचे मंजुरी पत्र वारासदार ज्योती इराण्णा माशाळे यांना सिनिअर ब्रँच मॅनेजर शहाबाज यांच्या हस्ते देण्यात आले.पतीच्या निधनानंतर ज्योती मशाळे या खचून गेल्या होत्या.पण बँक ऑफ इंडिया होटगी रोड शाखेने त्यांना विमा रक्कम देत नवे आयुष्य जगण्याचा आधार दिला.इरण्णा मशाळे यांनी पंतप्रधान जीवन ज्योती योजने अंतर्गत विमा घेतल्याचा फायदा त्यांच्या वारसांना झाला आहे.बँक मित्र गालिब मुछाले यांनी ज्योती मशाळे यांना धनादेश मिळवून देण्यासाठी मेहनत घेतली. दोन लाख रुपयांचे धनादेश घेत असताना ज्योती मशाळे यांचे डोळे पाणावले होते.या प्रसंगी अनुपमा यवतकर,,श्रीकांत गंजाई, अंकुश घोरबांड, शिवकुमार मठ, दत्तात्रय संकपाळ,बँक मित्र गालीब मुछाले, रमेश वाघमारे, विमा कंपनी स्टार युनियन दाई-ची लाईफ इन्शुरन्स लिमिटेड अधिकारी देखील उपस्थित होते.