Now Loading

राष्ट्रीय मुद्रीकरण स्रोत च्या खाजगीकरण च्या विरोधात सिटू चा एल्गार !

नॅशनल मॉनेटायझेशन पाईपलाईन च्या नावाखाली 6 लाख कोटी रुपयांची देशाची सार्वजनिक मालमत्ता या राष्ट्रीय संपत्तीचे खाजगीकरण करणार असल्याची घोषणा मोदी सरकार कडून झाली.यामध्ये महामार्ग, रेल्वे,विमानतळ, वीजनिर्मिती प्रकल्प, पाईपलाईन्स, जमिनी आणि इमारती,स्टेडियम,कोळसा खाणी, दूरसंचार,जलवाहतूक, अन्नधान्य गोदाम याचे पुढील 25 वर्षासाठी खाजगी कंपन्यांना भाड्याने दिली जाणार आहेत अर्थातच देशाला पुन्हा गुलामीकडे नेत आहेत.ही या देशातील श्रमिक कष्टकऱ्यांची संपत्ती आहे.याचे खाजगीकरण चालणार नाही अशी परखड टीका सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स चे महासचिव ऍड.एम.एच.शेख यांनी केली. गुरुवार दिनांक 21 ऑक्टोबर रोजी कुंभारी येथे राष्ट्रीय मुद्रिकारण पाईपलाईन च्या खाजगीकरणा विरोधात ऍड.एम.एच.शेख यांच्या अध्यक्षतेखाली कामगारांचा मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर सिद्धपा कलशेट्टी, फातिमा बेग,शेवंता देशमुख,सलीम मुल्ला, शंकर म्हेत्रे, विल्यम ससाणे,शकुंतला पानिभाते, बापू साबळे,हसन शेख, सुनंदा बल्ला,अशोक बल्ला,अनिल वासम,वसीम मुल्ला, मल्लेशाम कारमपुरी, लिंगवा सोलापूरे,मारेप्पा फंदीलालू, हसन शेख आदी उपस्थिती होती. प्रास्ताविक व्यंकटेश कोंगारी यांनी केले.सूत्रसंचालन अनिल वासम यांनी केले.आभार प्रदर्शन विल्यम ससाणे यांनी केले.