Now Loading

-फुटबॉल स्पर्धेची अंतिम फेरी शनिवारी दि. २३ रोजी

कुडचडेचे येथील कुडचडे काकोडा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष बाळकृष्ण होडारकर व युनिटी स्पोर्ट्स फीस्टा कुडचडे यांच्या संयुक्त विद्यमानाने दि. २५ सप्टेंबर पासून सुरु असलेली २०२१-फुटबॉल स्पर्धेची अंतिम फेरी शनिवारी दि. २३ रोजी संध्याकाळी पंटेमळ, कुडचडे येथील फिदालगो मैदानावर खेळविण्यात येणार असल्याची माहिती आयोजकानी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष बाळकृष्ण होडारकर, आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळाडू आल्वीटो डीकुन्हा व अंतिम सामन्यातले दोन्ही संघांचे कॅप्टन उपस्थित होते.