Now Loading

ई-स्क्वेअर, लक्ष्मीनारायणचा पडदा आज उघडणार

कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून बंद असलेली देशभरातील सिनेमागृह ५० टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीमध्ये शुक्रवारपासून सुरू होणार आहे. सोलापूर शहरातील ई-स्क्वेअर व लक्ष्मीनारायण टॉकीज येथे उद्यापासून खुली होत असून सकाळी ९.३० ते रात्री ९ वाजेपर्यंत रोज ५ शो होणार आहेत. ई-स्क्वेअर येथे पहिल्या दिवसाची ५० तिकिटे बुक झाली आहेत. शासनाने दिलेल्या नियमानुसार शारीरिक अंतर व मास्कचा वापर करूनच सिनेमागृहात प्रवेश दिला जाणार असल्याचे व्यवस्थापक नागेश मस्के यांनी सांगितले. शहरातील इतर सिनेमागृह पाच नोव्हेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे. प्रवेशासाठी असे नियम : सिनेमागृहात प्रवेश देताना कोरोना लसीचे दोन डोस घेणे बंधनकारक आहे. लस घेतली नसल्यास आरोग्य सेतू अॅपमध्ये असलेली माहिती पडताळल्यानंतर प्रवेश देण्यात येईल.