Now Loading

महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण जबरदस्तीने नेले चोरून

याच हकीकत अशी की न्यू संतोष नगर सोसायटी येथे राहणारे  सुमन गोविंद काळे या सोसायटीमध्ये गुरुवारी सकाळच्या सुमारास वाकिंग करत असताना समोरून काळ्या रंगाची मोटरसायकलवर दोन अनोळखी इसमपैकी मागे बसलेल्या इसमाने गळ्यातील सोन्याच्या गंठनला हिसका मारून जबरदस्तीने तोडून सोन्याच्या गंठण मधील 30 हजार रुपये किमतीचे ऐवज चोरून नेले आहे. म्हणून फिर्यादी सुमन गोविंद काळे यांनी दिलेल्या फिर्यादवरून अनोळखी दोन इसमाविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कोल्हाळ हे करीत आहेत.