Now Loading

एसआरपी कॅम्प येथे पोलीस स्मृतीदिन

राज्यराखीव पोलीस बलगट १० येथे शहीद पोलीसांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. माढा तालुक्यातील शहीद राहुल शिंदे याच्या आई-वडीलांना बोलवून त्यांचा सन्मान करण्यात आला. याचबरोबर राहुल शिंदे यांना आदरांजली वाहण्यात आली. २६/११ च्या ताज हॉटेल हल्ल्यावेळी राहुल शिंदे शहीद झाले होते. एस. आर. पी. कॅम्प येथे हॉल बांधण्यात आला असून त्याचं नामकरण शहीद राहुल शिंदे सभागृह असं करण्यात आलं. वीरमाता साखरबाई, वीरपिता सुभाष शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन झालं.