Now Loading

IND vs ENG: भारत आणि इंग्लंड यांच्यातील रद्द झालेली मँचेस्टर कसोटी पुढील वर्षी येथे होणार आहे

इंग्लंड आणि भारत यांच्यात खेळल्या गेलेल्या 5 कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना रद्द झाल्यानंतर आयपीएल 2021 सुरू झाली. त्यानंतर आता आयसीसी टी -20 विश्वचषक सुरू झाला आहे. अशा स्थितीत भारत आणि इंग्लंडसाठी मँचेस्टर कसोटी खेळणे कठीण झाले आहे. पण आता हा सामना नियोजित झाला आहे. कसोटी सामन्याची विशेष बाब म्हणजे हा सामना आता मँचेस्टरऐवजी एजबॅस्टन येथे खेळवला जाणार आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ यांच्यात हा निर्णय घेण्यात आला आहे.