Now Loading

सैफ अली खान आणि राणी मुखर्जी यांच्या 'बंटी और बबली 2' चे टीझर रिलीज 19 नोव्हेंबरला

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान, राणी मुखर्जी, सिद्धांत चतुर्वेदी आणि शर्वरीचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'बंटी और बबली 2' चा टीझर रिलीज झाला आहे. सैफ आणि राणी या वेळी चित्रपटात नव्या स्टाईलमध्ये दिसणार आहेत. दुसरीकडे, सैफ आणि राणी 12 वर्षानंतर मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाचा टीझर यशराज फिल्म्सने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. या चित्रपटात वरिष्ठ बंटी आणि बबली सोबत सिद्धार्थ आणि शर्वरी हे कनिष्ठ बंटी आणि बबलीच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 19 नोव्हेंबर 2021 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.