Now Loading

पाटील इस्टेट प्रकल्प चार वर्षांत पूर्ण करणार झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांची ग्वाही

पुणे : पाटील इस्टेट येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प येत्या चार वर्षांत पूर्ण केला जाईल, अशी ग्वाही झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांनी दिली. अभियांत्रिकी महाविद्यालय पुणेच्या ग्रंथालय सभागृहात पाटील इस्टेट येथील झोपडपट्टी धारकांची शुक्रवार २२ ऑक्टोबर रोजी बैठक घेण्यात आली. या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक डॉ. भारतकुमार आहुजा, सक्षम प्राधिकारी वैशाली इंदानी, प्रकल्प सल्लागार संदीप महाजन आदी उपस्थित होते.