Now Loading

मोताळा तालुक्यातील तालखेड येथील महिलाचे बोराखेडी ठाणेदारांना दारूबंदीसाठी निवेदन..

मोताळा तालुक्यातील तालखेड येथील महिलाचे बोराखेडी ठाणेदारांना दारूबंदीसाठी निवेदन.. मोताळा : बोराखेडी पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या तालखेड गावा मध्ये मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री होत असून याबाबत आज या गावातील महिलांनी बोराखेडी पोलिस स्टेशनवर मोर्चा आणून गावातील होणारी अवैध दारू विक्री ही बंद करण्यात यावी यासाठी महिलांनी बोराखेडी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना याबाबत लेखी स्वरुपात निवेदन दिले आहे तालखेड गावांमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध देशी व गावठी दारु विकल्या जात असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्याचा महिलांना त्रास सहन करता लागत असून त्याबाबत महिलांनी आता टोकाची भूमिका घेतली असून लवकरात लवकर गावातील दारू बंद करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे याबाबत य इशारा सुद्धा देण्यात आला आहे