Now Loading

रेशनच्या 25 टन तांदूळाने भरलेला संशयित ट्रक बोराखेडी पोलिसांनी पकडला

मोताळा: बुलडाणा जिल्ह्यात रेशन धान्याची काळाबाजारीचे अनेक प्रकरण समोर आलेले असतांनाच बुलडाणाकडून गुजरातकडे काळ्याबाजारात जाणारा तांदूळाने भरलेला संशयित ट्रक बोराखेडी पोलिसांनी आज शनिवारी मोताळा येथील साक्षी बार समोर पकडला आहे. सदर ट्रक नांदेड येथील असून तेलंगाना राज्यातुन तांदूळ घेऊन गुजरातकडे जात होता,अशी माहिती पोलिसांनी दिली असली तरी मात्र याठिकाणी सखोल चौकशी होणे आता गरजेचे आहे