Now Loading

33 वे माळी समाज उपवर युवक युवती परिचय संमेलन रविवार दिनांक 2 जानेवारी 2022ला

33 वे माळी समाज उपवर युवक युवती परिचय संमेलन रविवार दिनांक 2 जानेवारी 2022ला जळगाव दि 24 :जळगांव (जामोद) व संग्रामपुर तालुका महात्मा फुले माळी समाज मंडळ जळगांव यांच्या वतीने उपवर युवक युवती परिचय संमेलन संदर्भात मा.आ.कृष्णरावजी इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली कृषी विज्ञान केंद्र जळगांव (जामोद) येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. विविध विषयांवर चर्चा करून, सदर बैठकीत परिचय संमेलन रविवार दिनांक 2 जानेवारी 2022 रोजी कृषी विज्ञान केंद्र जळगांव ( जा) येथे घेण्याचे ठरविले. *मा.आ.कृष्णरावजी इंगळे यांच्या संकल्पनेतून महात्मा फुले मंडळ जळगांव (जामोद) यांच्या माध्यमातून उपवर युवक युवती परिचय मेळावा, सामुहिक विवाह सोहळा ह्यांची सर्वप्रथम मुहूर्तमेळ महाराष्ट्रात रोवली सादर उपक्रमाची नोंद शासनाने पण घेतली तसेच मंडळाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवले मंडळाच्या या वर्षीच्या विविध कार्यक्रमासाठी सर्वानुमते अध्यक्ष:- पांडुरंगजी वेरुळकर(सोनाळा) कार्याध्यक्ष:-कैलासभाऊ घुटे(पि. काळे) सचिव:- डॉ.अरूणभाऊ राखोंडे (बोराळा) उपाध्यक्ष:-विनायकराव रहाटे(पळशी झाशी) व परमेश्वर वानखडे(खेर्डा खुर्द) कोषाध्यक्ष:-श्रीरामभाऊ निमकर्डे(वकाना) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. उपवर युवक युवती परिचय सम्मेलन नोंदणीची अंतिम तारीख दि. 13डिसेंबर 2021ठरविण्यात आली. सदर बैठकीला प्रा.हरिभाऊ इंगळे ,डॉ.एस.एन.भोपळे अभिमन्युभाऊ राखोंडे डॉ. सौ.स्वातीताई वाकेकर वासुदेवराव भोपळे महादेवराव घुटे,दशरथ तायडे सर,श्रीकृष्ण खिरोडकर *प्रवीणभाऊ भोपळे, डॉ.संदीप वाकेकर, त्र्यंबकराव घाटे, राजीव घुटे, अँड.रतन इंगळे, रामदास राऊत, जयदेवराव वानखडे,गणेश भड,मारोती वानखडे,गोपाल इंगळे,मोहन पान्हेरकार,राजीव घुटे,समाधान बगाडे, रामदास राऊत,संजय घाटे,शालीग्राम भोपळे,पांडुरंग भोपळे, विजय म्हसाळ,आकाश उमाळे, नितीन जाधव,अनिल इंगळे यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते *प्रस्ताविक नितीनभाऊ सातव यांनी केले तर आभार प्रदर्शन ज्ञानदेव राजनकार यांनी केले