Now Loading

जळगाव जामोद येथील क्रांती स्थल भिमनगर येथे ग्रंथ प्रवराना दिन सांगता

जळगाव जामोद येथील क्रांती स्थल भिमनगर येथे ग्रंथ प्रवराना दिन सांगता जळगाव जामोद शहरातील क्रांती स्थल भीम नगर मधील समता हॉल मध्ये ग्रंथ परवाना कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन भगवान गौतम बुद्धाच्या मूर्ती समोर प्रमुख अतिथी आयु संजय बबन पारवे नगर परिषद माजी उपाध्यक्ष, आयु मनोहर गोरे हेड कॉन्स्टेबल पोलीस स्टेशन खामगाव, आयु अनिल इंगळे नगर परिषद प्रकल्प अधिकारी, आयु राजेंद्र ठेंग न प शाळा क्रमांक 3 चे मुख्याध्यापक, आयु रामकृष्ण रजाने, आयुष संदीप वाकेकर, आयुब राजाभाऊ कोकाटे, आयु प्रसेंजित पाटील यांचे हस्ते झाले. नंतर पूजनीय भंते महाथेरो गुणरत्न यांच्या संमेक वाच्या मधून त्रिशरण पंचशील घेण्यात आली. नंतर ग्रंथ श्रवण करणाऱ्यांनी ग्रंथांमधून जी परीक्षा घेण्यात आली त्या सर्व श्रवण करणाऱ्यांना बक्षिसे वितरण मान्यवरांच्या हातून देण्यात आली. बक्षिसाचे स्वरूप पाच व्यक्तींना भगवान गौतम बुद्धाची प्रतिमा व साडी ब्लाऊज आणि एक भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ देण्यात येऊन प्रति स्पर्धकास एक एक धर्मग्रंथ आयु संजय पारवे यांनी स्वखर्चाने दिला . मान्यवरांचे स्वागत कार्यक्रम झाल्यानंतर सौ सीमा विजय तायडे, कुमारी योगिता भावराव तायडे, कुमारी जया जोगेंद्र तायडे यांनी धम्माबद्दल प्रबोधनपर भाषणे केली. कार्यक्रमाचा समारोप आयु गौतम गुलाबराव अरदाळे यांनी ग्रंथाचा शेवट म्हणून पठण करून विशेष धम्माबद्दल प्रबोधन केले . सदर कार्यक्रमाचे संचालन आयु अनिलइंगळे यांनी केले. कार्यक्रमात क्रांती स्थळ भीम नगर मधील आम्रपाली महिला मंडळ, भीम मित्र मंडळ ,भीम आर्मी व बौद्ध उपासक उपासिका यांनी चांगल्या प्रकारे कार्यक्रमाला विशेष लक्ष देऊन कार्यक्रम व्यवस्थित रित्या पार पाडला. आणि कार्यक्रम संपल्यानंतर सर्वांना भोजनदान देण्यात आले. आणि आभार प्रदर्शन गौतम अरदाळे यांनी केले. एकंदरीत कार्यक्रम मोठ्या ऊस उत्साहाने मंगलमय वातावरणात संपन्न झाला.